Share

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सरकारवर निशाणा साधत असतानाच, केव्हिन पीटरसन मोदींना म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली.

एकीकडे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेला कोरोनाची लस पाठवण्याचा भारताचा निर्णय उदारता आणि दयाळूपणा दाखवतं असं पीटरसन म्हणाला आहे.

भारत सरकारने कोरोनाच्या लशीची पहिली खेप अल्जेरिया आणि दक्षिण आफ्रिकेला पाठवले आहेत. याशिवाय भूटान, मालदीव, बांगलादेश, ब्राझील आणि नेपाळ यांनाही लस पाठवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची लस पोहोचवल्याबद्दल पीटरसनने मोदींचं अभिनंदन केलं आहे.

केव्हिन पीटरसनच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारताबाबतचं तुझं प्रेम पाहून आनंद झाला. जगच आमचं कुटंब असल्याचं आम्ही मानतो. कोरोनाविरुद्धची लढाई मजबूत करण्यासाठी आम्ही भूमिका बजावू इच्छितो,’ असं ट्विट मोदींनी केलं. भारताची उदारता आणि दयाळूपणा दिवसेंदिवस वाढत आहे. या देशावर माझं प्रेम आहे, असं पीटरसन म्हणाला होता.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!