मुंबई :- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली होती.
शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती.
शरजील उस्मानी यानं हिंदुविरोधी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शरजीलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे.
‘शरजील उस्मानीला महाराष्ट्र आणि मुंबईबाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं आहे. शर्जीलला पळून जायला दिल्यानंतर व भाजपनं दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु म्हणणं म्हणजे पश्चातबुद्धी आहे. हिंदू सडल्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचं काम शिवसेनेन का केलं ? हे स्पष्ट करावं,’ अशी मागणी देखील शेलार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले खिळे शेतकऱ्यांनी उपसले!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना


