Share

सामना ‘ड्रॉ’ किंवा ‘टाय’ झाल्यास कोणता संघ होणार विजयी ; ICC कडून नियम-अटींची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची आज घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा ‘टाय’ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.

आयसीसीने या कसोटीसाठी राखीव दिवसाचाही घोषणा केली आहे. या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!