Share

डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच

Published On: 

नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क सुरू करणार आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी याची घोषणा केली. या नेटवर्कचे ‘ट्रुथ सोशल’ नाव असणार आहे.

ट्रुथ सोशल हे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपच्या मालकीचे असणार आहे. आणि पुढच्या महिन्यात काही ठराविक लोकांसाठी या नेटवर्कचा बीटा लाँच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये हे प्री-ऑर्डरसाठी अगोदरच उपलब्ध आहे, असं टीएमटीजी ग्रुपने निवेदनात सांगितले आहे.

या निवेदनात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘ मी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या अत्याचाराविरोधात ट्रम्प मीडिया आणि तंत्रज्ञान आणि ट्रुथ सोशल सुरू करत आहे.आपण अशा जगात राहतोय जिथे तालिबानी ट्विटर वापरू शकतात, मात्र सर्वांच्या आवडत्या माजी अमेरिकन अध्यक्षावर बंदी घालण्यात आली आहे. असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला कॅपिटल बिल्डिंगमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसा केल्यानंतर ट्विटर आणि फेसबुकने कारवाई करत ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!