Share

भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.

‘इतक्या कमी कालावधीत भारताने 100 कोटी कोरोना लसीकरण पूर्ण करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत पूर्ण योगदान देणाऱ्या सर्व आरोग्य आणि इतर कामगारांचे अभिनंदन’. असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान भारत देशही १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!