Share

रुग्णसेवा द्यावी की नाही? रुग्णालय प्रशासनाचा पालिकेला थेट सवाल

Published On: 

नंदुरबार – एका बाजूला राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसऱ्या बाजूला आरोग्य आणि प्रशासन यंत्रणेतील संवादातील अभाव समोर येत आहे. नंदुरबार शहरातील स्पर्श रुग्णालयावर पालीकेने सोशल डिस्टंसिंग पालन झाले नसल्याची कारवाई केल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि पालीका कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाले.

दोन्ही बाजुंनी एकमेकावर अरेरावीची भाषा झाल्याचा दावा केला असुन पालीका प्रशासनाने सदर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्णालय प्रशासनाने पालीकेचा हा मनमानी कारभार असुन आपण रुग्णसेवा द्यावी की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुळातच रुग्णांसोबत दोन नातेवाईक आल्याने रुग्णालयाच्या बाहेर गर्दी झाली असल्याच रुग्णालय प्रशासनाचे म्हणने आहे. मात्र आपला स्टाफ रुग्णांना सोशल डिस्टंसिगच्या सुचना देत असतांनाच पालीका प्रशासनाने या ठिकाणी येत अरेरावी करत कारवाईची भाषा केल्याने आयएमएच्या पदाधिकाऱयांना याठिकाणी बोलवल्याचा दावा रुग्णायाच्या डॉक्टरांनी केला आहे.

दरम्यान, रुग्णायात सोशल डिस्टंसिगचे पालन होत नसतांना दस्तुरखुद्द मुख्याधिकाऱयासोबत अरेरावी केल्याचा दावा नंदुरबार नगरपालीकेच्या मुख्याधिकाऱयांनी केल्याने आता शहरातील रुग्णालय आणि पालीका प्रशासन समोर समोर येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

भूमिपुत्रांना रोजगार देण्याऐवजी परप्रांतीय मजुरांसाठी पायघडया अंथरल्या जात आहेत – मनसे

#Coronavirus : ‘कोरोना उपचाराच्या जाहिराती कराल तर खबरदार’

महाराष्ट्रातील ‘या’ मातब्बर कॉंग्रेस नेत्याच्याही मनात येत होते सुशांत सारखेच विचार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!