Share

भूमिपुत्रांना रोजगार देण्याऐवजी परप्रांतीय मजुरांसाठी पायघडया अंथरल्या जात आहेत – मनसे

Published On: 

मुंबई – भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी नेहमी आग्रही असलेली मनसे पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी परतले आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याऐवजी परप्रांतीय मजुरांसाठी राज्य सरकारकडून पायघडया अंथरल्या जात आहे अशी टीका कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

परप्रांतीय मंजूर त्यांच्या मूळ गावी लॉकडाऊनच्या काळात गेले होते. आत्ता त्यांना पुन्हा राज्यात आणले जात आहे. गेल्या पंधरा दिवसात जवळपास दीड लाख मजुरांना महाराष्ट्रात परत आणले. भूमिपुत्रंसाठी रोजगाराच्या संधी न देता परप्रांतीयाना पुन्हा राज्यात परत आणण्याचे प्रयोजन काय? असा थेट सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोरोनाने महाराष्ट्रात हाहाकार माजविला आहे. भूमिपुत्रांवर बेकारीची तलवार टांगती आहे. अश्या कठीण काळात मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेने उभे राहणे अपेक्षित असताना खा. अरविंद सावंत यांचा एक व्हिडिओ चांगलाच वादात सापडला आहे.

दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या एका व्हिडीओमध्ये ते परप्रांतीय मजुरांचे कौतुक करताना दिसत आहेत. अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर मनसेनं संताप व्यक्त केला आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि नेते नितीन सरदेसाई यांनी अरविंद सावंत यांच्यावर तोफ डागली आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करून तुम्ही राज्यातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात येण्यास सांगत आहात, पण तुम्हीसुद्धा महाराष्ट्राचे मुंबईचे खासदार आहात हे विसरू नका, असा इशारा मनसेनं दिला आहे.

बच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश

‘लवकरच पाकव्याप्त काश्मीरचे लोक म्हणतील आम्हाला भारतात राहायचं आहे’

भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!