Share

#Coronavirus : ‘कोरोना उपचाराच्या जाहिराती कराल तर खबरदार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार होत आहे. यातच उपचाराबाबत चित्र-विचित्र जाहिराती करून कोरोना बरा होत असल्याचा दावा केल्यास त्यांच्या विरुद्ध कारावाई केली जाईल, असा इशारा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करत असताना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादूर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करीत असल्याचे निदर्शनास आले आहे,’ असे शिंगणे म्हणाले.

तसेच चुकीचा दावा करून दिशाभूल करणाऱ्या उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

दरम्यान, कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!