मुंबई- सुशांत सिंग राजपूत सारख्या गुणी अभिनेत्याची एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलीय. सुशांतसिंह राजपूत याच्या एक्झिटमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री,पंतप्रधान यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी, कलाकारांनी ट्विटच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केलेलं ट्वीट चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे. माझ्याही मनात जीवन संपविण्याचे विचार आले होते. एकदा नाही तर दोनदा… लहान असताना एकदा आणि खासदार असताना दुसऱ्यांदा. मात्र नंतर नैराश्यावर मात करत मी दुःखासोबत जगायला शिकलो, असा धक्कादायक खुलासा देवरा यांनी केला आहे.
My own experience with suicidal thoughts, first as a teen & even as an MP, taught me to live with the blues. Sharing 5 effective coping tools… pic.twitter.com/yMiVfAgC9U
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) June 14, 2020
दिव्य मराठीने दिलेल्या वृत्त्नुसार, या ट्वीटमध्ये माझ्याही मनात असेच विचार आले होते, हे सांगतानाच देवरा यांनी नैराश्यावर कशी मात करावी याबाबत काही उपाय सुचवले आहेत. कुटुंबीय, मित्र, सहकारी यांना भेटा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. नैराश्य हे वय, लिंग, आर्थिक स्थिती, यश यावर अवलंबून नसते. ते कोणालाही येऊ शकते. म्हणूनच मानसिक आरोग्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. आपल्या आतील राक्षसासोबत लढत राहा. त्याला कधीच बाहेर येऊ देऊ नका. आयुष्य सुंदर आहे. पुढे जाण्याच्या शर्यतीत अडकू नका. ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो ते करा, संगीत, प्रवास, कुकिंग, वाचन, तुमचे छंद जोपासा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतवर मुंबईत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वडील के. के. सिंह, बहिणी, अभिनेत्री आणि सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, कृती सेनन, श्रद्धा कपूर, विवेक ओबेरॉयसह २५ जण उपस्थित होते. अस्थी विसर्जन पाटण्यात गंगेत केले जाणार आहे.
नाद खुळा : ‘या’ पठ्ठ्याने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारा राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत
भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

