Share

‘गुजरातची तातडीने पाहणी करणारे पंतप्रधान महाराष्ट्रावर संकट ओढावल्यावर कुठे होते?’

Published On: 

मुंबई : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.

राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले असून तातडीची मदत म्हणून पुरबाधितांच्या खात्यात १० हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे देखील मदतीचा हात मागितला असून तौक्ते चक्रीवादळानंतर गुजरातची पाहणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती झाल्यानंतर कुठे होते असा सवाल काँग्रेसने उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

‘अतिवृष्टी व महापुराने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे परंतु या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले नाही. अजूनही केंद्र सरकारची कुठलीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. एनडीआरफची मदतही मिळालेली नाही. महाराष्ट्रावर आपत्ती कोसळली असताना पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री कुठे होते?,’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!