मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयने बुधवारी रात्री अटक केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. देशात कायद्याचं राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे अशी टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक तुम्ही करता, पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? नवाब मलिकजी, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट…’, असं ट्वीट करत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे.
https://twitter.com/mipravindarekar/status/1433131255286026240
काय आहे प्रकरण?
राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात काल बुधवारी रात्री अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने अपहरण करुन ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयनं ताब्यात घेतले. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळं आणि नाट्यमय वळण मिळाले. वकिलांनी सीबीआय अधिकाऱ्याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
‘या देशात कायद्याचे राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे’, असा संतप्त मंत्री नवाब मलिक यांनी केला. ‘अनिल देशमुख यांची मुलगी, सून, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा-बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती देशमुख यांच्या मुलीला किंवा सूनेला दिलेली नाही, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. एकंदरीत ही सर्व कारवाई बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नसल्याने सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत

