Share

‘ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच…’; अनिल बोडेंचं खळबळजनक वक्तव्य

Published On: 

मुंबई: त्रिपुरा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळाले. अमरावती येथे मोठा हिंसाचार घडला त्यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या व्यक्तव्याचे त्यांनी समर्थन देखील केले आहे. मी माझ्या वक्तव्यावर पूर्णपणे ठाम आहे, कारण मी जे काही बोलतो ते शुद्धित बोलतो. कोणतीही हर्बल तंबाखू खाऊन बोलत नाही, त्यामुळे नवाब मलिक यांच्या सारखं बेशुद्धित विधान करायची माझी सवय नाही, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ता तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या राज्यात दंगली होत नाही, महाविकासआघाडी सरकारच्या राज्यात किंवा तथाकथित सेक्युलर, डाव्या विचारांच्या राज्यात दंगली होतात. कारण, या दंगलीला संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं, प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं. सरकारमधील मंत्री करतात, हा माझा स्पष्ट अनुभव आहे, असं खळबळजनक वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!