Share

बापरे! अनन्याच्या कानात ओरडणारा हा व्यक्ती आहे तरी कोण?

Published On: 

मुंबई : अनन्या पांडेच्या कानात ओरडणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. सगळयांनाच याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असून ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसन आहे. नुकतेच अभिनेत्री अनन्या पांडे सध्या लॉस एंजेलिस, अमेरिकेत आहे. ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसनही महत्त्वाच्या भूमिकेत असून अनन्याने काही काळापूर्वी माईक टायसनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये माईक अनन्याच्या कानात ओरडताना दिसत आहेत. तसेच अनन्या आनंदाने हसत असताना दिसत आहे.

या फोटोमध्ये अनन्या ब्लॅक टॉप आणि ब्लू डेनिममध्ये दिसत आहे, तर माईक टायसन ग्रे टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत अनन्याने लिहिले की, “आम्ही त्यांच्यासोबत चांगले चाललो आहोत.” यासह, तिने कॅप्शनमध्ये अनेक प्रकारचे इमोजी समाविष्ट केले आहेत. याशिवाय अभिनेत्री चार्मी कौरने ही अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अनन्या, विजय देवरकोंडा, दिग्दर्शक जगन्नाथ पुरी आणि माईक टायसन यांच्यासह पोझ देत आहे. तिने माईक आणि विजयचा एकत्र फोटोही शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CWXZF9_tcGD/?utm_medium=copy_link

विजय देवरकोंडा आणि माईक टायसनचा फोटो शेअर करत चार्मी कौरने लिहिले की, “लायगर टीम सुपरकूल दिग्गज माईक टायसनसोबत काम करत खूप छान वेळ घालवत आहे. त्याचे हृदय खूप छान आहे.” आणखी एक फोटो शेअर करत चार्मीने लिहिले की, “नक्कीच तो माझा नवीन आवडता आहे. स्टीलचे शरीर आणि सोन्याचे हृदय.’या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप उत्सुक आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!