मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पूजाचा मृत्यू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्याप संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. एवढेच काय तर राज्याच्या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिलेली नाही. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत??
संजय राठोड चे संरक्षण करण्यातं तर व्यस्त नाहीत ना ???
संपुर्ण राज्याचे डोळे पूजा चव्हाण प्रकरणाकडे लागलेत आणि त्यावर गृहराज्यमंत्र्याची बोटभर ही प्रतिक्रिया नसावी हे आश्चर्यकारक आहे @CMOMaharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 15, 2021
‘पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत?? संजय राठोडचे संरक्षण करण्यातं तर व्यस्त नाहीत ना ?? संपुर्ण राज्याचे डोळे पूजा चव्हाण प्रकरणाकडे लागलेत आणि त्यावर गृहराज्यमंत्र्याची बोटभर ही प्रतिक्रिया नसावी, हे आश्चर्यकारक आहे’, अशा आशयाचे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी नाव न घेता गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई व सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?
- आता पदव्यूत्तर विभागाचे अभ्यासक्रम एकसमान राहणार
- तीन वाहने फोडून लॅपटॉप लांबवला
- पोलिसांचा नाकर्तेपणा की मंत्र्यांना मुभा, कोरोनाचे नियम फक्त शिवजयंतीलाच का?
- देशभक्त आणि देशद्रोही मधील फरक मोदींना समजत नाही : प्रियांका गांधी


