Share

Sharad Pawar : “पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, पण हे राज्यपाल…”; शरद पवारांची सडकून टिका

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकासाआघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. मात्र जे आमदार शिवसेनेतून फुटून शिंदेंसोबत गेले आमदारांनी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेना संपवण्याचा घाट घातला जात होता. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना बळ देण्याचं काम होतंय, राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांनाच अधिक निधी दिला जात होता, असे गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलंय. तसेच त्यांनी यावेळी राज्यपालांना देखील टोला लगावला.

शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले कि, राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर 48 तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, पण हे राज्यपाल… अशा शब्दात पवारांनी राज्यपालांवर टीका केलीय.

दरम्यान, पुढे बोलताना पवार म्हणाले कि, शिवसेनेच्या मतदारसंघात जाण्याचा आम्ही विचारही केला नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण मी हे अजून माझ्या पक्षात बोललो नाही आणि काँग्रेससोबतही बोललो नाही. मध्यावधी निवडणुका होतील असं मी म्हणालोच नव्हतो. फक्त कामाला लागा असं सांगितलं होतं. बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही. लोकांना काहीतरी सांगायचं म्हणून सांगत आहेत, अशी टीकाही पवार यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर केलीय. ते आज औरंगाबादेत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!