Share

‘ते’ १०० कोटी रुपये गेले कुठे ? याचा उल्लेखच नाही – शरद पवार

Published On: 

दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, प्रकरण अंगाशी येताच ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. महाविकास आघाडीमधील सर्व महत्वाच्या नेत्यांच्या आता या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गंभीर प्रकरणावर मौन सोडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. तर, परमबीर सिंह यांच्या गंभीर आरोपानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात कमालीची अशांतता पसरली असून शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे.

‘परमबीर सिंग यांनी आरोप हे बदलीनंतर केले आहेत, पदावर असताना कुठलेही आरोप त्यांनी केले नाहीत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला देखील पाठवलं आहे. मात्र, यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते याचा उल्लेख यात नमूद करण्यात आलेला नाही.’ असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!