Share

…म्हणून फडणवीस शरद पवारांच्या भेटीला गेले असावेत; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाष्य

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी जोरदार टीका केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असं सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘पवारसाहेबांवर दोन-तीन छोट्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. फडणवीसांनी याआधीच पवारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज पवारांनी त्यांना वेळ दिली असावी. त्यामुळेच पवारांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस जाणार होते, ते आज गेले असतील,’ असं मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!