सिंधुदुर्ग – मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजी छत्रपती मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आपण मोदींवर नाराज नाही, असं सांगत संभाजी छत्रपती यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
संभाजीराजे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे म्हणाले की, मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी मला उद्याही भेटीसाठी वेळ देऊ शकतात. पण हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न नाही. समाजाचा विषय आहे. सगळ्या खासदारांना घेऊन मला त्यांना भेटायचं आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नुकताच 7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला होता. मी सरकारला कोणताही अल्टिमेटम दिला नाही. शिवराज्यभिषेक सोहळा असतो. त्यामुळे त्या दिनाचं औचित्य साधून सरकारने मराठा समाजाच्या या पाच मागण्यांवर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- कोरोना नियमांची पायमल्ली करत आमदार महेश लांडगेंचा डान्स, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
- मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल – सामना


