औरंगाबाद : शेतक-यांचे प्रश्न शेतक-यांनीच मांडायचे, महिलांचे प्रश्न महिलांनी मांडायचे, मागासवर्गीयांच्या प्रश्नावर त्यांनीच भांडायाचे अशा विचारांच्या व कृतीच्या चौकटीत अडकलेला भारतीय समाज हे केव्हा मोडणार, असा प्रश्न माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी उपस्थित केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात बुधवारी प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरु डॉ.भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. केंद्राचे संचालक डॉ.एन.एन.बंदेला व सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल रापेâ यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवसभराच्या या कार्यशाळेत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले (विषय – उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह), डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण’, परीक्षा व मुल्यमापण मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांचे ‘परीक्षा पध्दतीतील सुधारणा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी माजी कुलगुरु डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख ३ हजार कोटी रुपयावरुन शिक्षणासाठीची तरतूद १४ हजार कोटींवर आणण्यात आली. एक बाजुला सहकारी संस्था व शिक्षणाचे बाजारीकरण होत असतांना सरकारी तरतुद होत आहे ही बाब चिंताजनक आहे, असेही डॉ.मुणगेकर म्हणाले.
उच्च शिक्षणात मोठे फेरबद्दल गरजेचे
एका बाजुला जागतिकीकरणाने उच्च शिक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान व स्पर्धा निर्माण झालेली असताना भारतात उच्च शिक्षणात मोठे पेâरबदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. सुमारे एक तासाच्या भाषणात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी कोविड नंतरचे शिक्षण, संशोधनाचा दर्जा, स्किल कोर्सेस यासह विविध विषयांचा अहापोह केला. कोवीडने माणसाचा खुप काही शिकवेल मात्र याचा धडा आपण किती घेतला हा अभ्यासाचा विषय आहे. आगामी विद्यापीठ अर्थसंकल्पात सॉफ्ट स्किल बेस्ड कोर्सेससाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र

