Share

‘देशावर जेव्हा संकटं आली तेव्हा कड्या-कुलुपं लावून घरात बसले, संजय राऊतांची टीका

Published On: 

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरु करण्यापूर्वी शिवतीर्थावर जाऊन दर्शन घेतले होते. मात्र यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची मानसिकता संकुचित असल्याचे म्हटले होते. यावरच संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

‘जेव्हा बाबरी पाडण्याचा प्रकार झाला तेव्हा सर्वजण पळून गेले होते. १९९२ साली मुंबईत बॉम्ब स्फोट झाला त्या दंगलीत देखील शिवसेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

‘शिवसेनेची मानसिकता काय आहे हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांना माहिती आहे. शिवसेना एक प्रखर हिंदुत्वावादी पक्ष आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा शिवसेनेनं आणि शिवसेना प्रमुखांनी छातीचा कोट करुन त्या संकटाशी सामना केलाय. बाबरी कोसळत असताना ज्यांनी हात वर केले होते. मुंबईत जेव्हा दंगली उसळल्या होत्या. त्यात पाकिस्तानचा हात होता. तेव्हा शिवसेना प्रमुखाच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन त्या दंगेखोरांशी सामना केला होता. तेव्हा सगळे कड्या कुलूपं लावून आतमध्ये बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणत आहेत.’ असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!