मुंबई : गोवा क्रुझ पार्टी आणि राज्यातील ड्रग्स छापेमारी प्रकरणावरुन नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण अधिकारी आणि साक्षीदारांना टार्गेट करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या प्रकरणातून फक्त प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते त्यावर हे नेते गप्प बसतात. गृहमंत्री फरार आहेत त्यावर हे गप्प आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची इतकी प्रकरणे सुरू आहेत, त्यावरून लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.
एनसीबी ड्रग्स प्रकरणात कारवाई करतं, याचा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? मग असं म्हणायचं का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करत आहात ? मुळात त्यांचं दुःख आहे की, सतत पडणाऱ्या छाप्यामुळे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडूनही सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी केली जाणार
- ‘ठाकरे’ सरकारतर्फे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ; आ. डॉ. मनीषा कायंदेंच्या मागणीला यश!
- ‘भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात’, रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य
- हल्ली बायका पण असा चोमडेपणा करत नाहीत; नवाब मलिकांवर क्रांती भडकली
- समीर वानखेडे कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत- क्रांती रेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

