Share

‘भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात’, रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य

Published On: 

मुंबई : आज(२६ ऑक्टो.)पत्रकार परिषदेत बोलत असतांना केंद्रीय मंत्री रामदास यांनी चित्रपट उद्योगात सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात आणि भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज आहे,असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तसेच चित्रपटसृष्टीत अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असून त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. तसेच अमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांना मात्र व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात यावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये किंवा तुरुंगात टाकू नये, असेही ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलतांना आठवले म्हणाले की,’जे दारू पितात किंवा सिगारेट ओढतात त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही, परंतु ज्यांच्याकडे अमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरुंगात टाकले जाते. बदलण्याची गरज आहे आणि जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्ज वापरतात त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले पाहिजे, त्यामुळे ते सुधारतील असा आमच्या मंत्रालयाचा विश्वास आहे.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्त वसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच’, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!