Share

भल्याभल्यांना चकवा देणारे रावसाहेब दानवे जेव्हा सारीपाट खेळतात!

Published On: 

औरंगाबाद : जालना लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचा लस घेतानाचा फोटो मागे चांगलाच व्हायरल झाला होता. ग्रामीण ढंगातील बोलण्यामुळे ते अनेकदा वादात सापडले होते. केंद्रीय मंत्री झाले तरी गावाकडची नाळ सुटली नसल्याचे एका प्रसंगावरून समोर आले आहे. त्यांनी चक्क पारावर बसून ग्रामस्थांसोबत सारीपाट या खेळाचा आनंद घेतला.

आज सोमवारी दानवे त्यांची सासुरवाडी सिल्लोड(जि.औरंगाबाद) तालुक्यातील निल्लोड येथे आले होते. पोळा सण असल्याने रस्त्याने जातांना एका ठिकाणी शेतकरी बैलांना सजवत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी दानवे यांनी शेतात जाऊन बैलांना हाती धरुन पाहणी केली. त्यानंतर गावातून जात असताना मारुती मंदिरासमोर काही ग्रामस्थ सारीपाट खेळताना त्यांच्या नजरेस पडले.

ग्रामस्थांनी गावचे जावई असलेल्या मंत्री दानवे यांना सारीपाट खेळण्याचा आग्रह केला. अन् सासुरवाडीचा आग्रह ते मोडू शकले नाहीत. उत्सुकता म्हणून रावसाहेब दानवेंसह सर्वांनी काहीवेळ सारीपाटाच्या खेळाचा आनंद घेतला. दानवेंनी जमिनीवर बसून सारीपाट खेळाचा आनंद घेताना व्हि़डिओत दिसून येत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात बड्या नेत्यांना मोदींनी नारळ देत त्यांचे राजीनामे घेतले. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन या कॅबिनेट मंत्र्यांसह बारा जणांच्या या यादीत जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे देखील नाव असल्याची चर्चा होती. मात्र, परंतु या बदलाच्या वावटळीत देखील दानवे यांचे मंत्रीपद साबूत राहिले. उलट दानवे यांना केंद्रातील महत्वाच्या रेल्वे खात्याचा कारभार सोपवत त्यांना मोठी जबाबदारीही देण्यात आली. त्यामुळे भल्याभल्यांना चकवा देणाऱ्या दानवेंनी सारीपाट खेळला याची चर्चा जोरात सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!