🕒 1 min read
मुंबई : कर्नाटकसह सर्व राज्यांचे लक्ष लागून असणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने निविर्वाद आपला झेंडा फडकवला आहे. भाजपने एकहाती सत्ता काबीज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवला तोच भगवा मुंबई महापालिकेवर फडकवणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आज बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला. उद्या तोच भगवा मुंबई महापालिकेवर वर फडकणारच, असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणेंनी याबाबत ट्वीट करत शिवसेनेला अप्रत्यपणे इशारा देण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने ३६, काँग्रेसनं १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत.
आज बेळगाव महापालिकेवर "भगवा" फडकला ..
उद्या तोच "भगवा" मुंबई महापालिकेवर वर फडकणारच !!!— Nitesh Rane (@NiteshNRane) September 6, 2021
भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती भगवा फडवणार अशी संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. मात्र त्यांचा चांगलाच अपेक्षा भंग झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ट्विट नको जीआर हवा’ ; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राजू शेट्टी मुंबईत दाखल
- संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले
- वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
