Share

Sanjay Raut | “आमचे सरकार आल्यावर बच्चू कडू आमच्या सोबत येतील”; संजय राऊतांची बोचरी टीका 

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि अचानक चीनने घुसखोरी कशी काय केली?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या प्रश्नावरून राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमीवर नाराजी व्यक्त करत कर्नाटकचा बंदोबस्त काढून केंद्राची सुरक्षा का उभी केली नाही?, असा सवाल उपस्थित केला आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर मिश्किल टीका केली आहे. आमचे सरकार आल्यावर बचू कडू आमच्या सोबत येतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. राज्यात असे काही नेते आहेत सरकार जिथे तिथे जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

चीन विषयी कोणीही मोठा नेता बोलत नाही. पाकिस्तानचे नाव घेतात, मात्र चीनचे नाव घेत नाही, चीनला घाबरतात, अमित शहा म्हणतात जमीन जाऊ देणार नाही मात्र जमीन याआधीच गेली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलीय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!