Share

Sanjay Raut | “वारकरी संप्रदायाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलले नाहीत?”; संजय राऊतांचा खोचक सवाल 

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं त्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे येणाची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकरी संप्रदायाचे नेते सुषमा अंधारेवर बोलत आहेत, ते छत्रपती अपमानावर का बोलले नाहीत?, असा खोचक सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सातत्याने वारकरी वारकरी सांप्रदायाबरोबर राहिले. त्यांचे प्रश्न, त्यांच्या भूमिका, हिंदुत्ववाद असेल कधीही शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी वारकरी संप्रदायाचा अवमान केलेला नाही, करणार ही नाही, आमच्या स्वप्नातही नाही.

पुढे ते म्हणाले, “त्यांना या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या प्रमुख लोकांशी चर्चा सुरू असून स्वतः सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. वारकरी संप्रदाय आमचे सर्व दैवत असून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, विठोबा माऊली असते यांच्याविषयी आमच्या मनात नितांत श्रद्धा आहे.”

सुषमा अंधारे यांना देखील टार्गेट केले जात असून 2009 च्या फायली काढत आहेत. सुषमा अंधारे शिवसेनेची बाजू मांडत फिरत आहेत, महाप्रबोधन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. त्याचा राग येणं काही लोकांना साहजिकच आहे. काही वर्षांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी भाजप गरळ ओकत होते, मात्र भाजपने आता मेहबुबा मुफ्तीबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली आहे, त्यांचे व्हिडिओ काढायचे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!