Share

समोर आल्यावर प्रहार होत असतो, पण राजकारण करणार नाही- नारायण राणे

Published On: 

मुंबई : सिंधदूर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्धाटनाचा आज सोहळा पार पडणार आहे. दुपारी 1 वाजता या विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. या विमानतळावरुन भाजप आणि शिवसेनेत मोठा श्रेयवाद सुरु आहे. या विमानतळावरुन भाजप-शिवसेनेत राजकीय शिमगा सुरु आहे. मात्र मंचावर कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंच कृत्य आमच्याकडून होणार नसल्याचं राणेंनी सांगितलं. आजचा कार्यक्रम हा शिवसेना-भाजपच्या वादाची नांदी ठरण्याच्या दाट शक्यता आहेत.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली होती. मात्र, 18 तास होत नाही तोच राणे बॅकफूटवर गेले आहेत. जो समोर असतो त्याच्यावर प्रहार होत असतो. पण उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.नारायण राणे आज सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही. राजकारण केलं जाणार नाही. उद्घाटनाला कोणतंही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असं राणे म्हणाले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!