मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती असणं हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणेंनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाला गालबोट लागू नये असा आमचा प्रयत्न असणार आहे असंही नितेश राणे म्हणाले. दरम्यान आज व्यासपीठावरुन नारायण राणे त्यांचं मन मोकळं करणार आहेत. कुणाला ते आवडेल तर कुणाला ते खुपेल हे सांगायला नितेश राणे विसरले नाहीत.
आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, कोणतंही राजकारण केलं जाणार नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं स्वागत केलं जाईल, मुख्यमंत्री आणि आपण शेजारी-शेजारी बसण्याचा योग येणार आहे ही चांगली गोष्ट आहे असंही नारायण राणे म्हणाले.
कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरु आहे, या हप्तेखोरांची नावे मी जाहीर करणार आहे. कोकणाच्या विकासाला आड येणाऱ्या लोकांचा भांडाफोड मी सभेत करणार आहे असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते. त्यावर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर आरोप करु नये अशी टीका शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेसाहेब, हप्तेखोरांची नावं जाहीर कराच; वैभव नाईक यांचं ओपन चॅलेन्ज
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

