सांगली : राज्य निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतीमधील मागास प्रर्वगासाठी राखीव जागांवर निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारासाठी दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर २०२० रोजी शासकीय सुट्टी असली तरी ग्रामपंचायत निवडणुक लढवु इच्छिणाऱ्या अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणुन शासकीय कार्यालय सुरु ठेवण्यात आलेली आहेत.
ग्रामपंचायत निवडणुक लढवु इच्छिणारे अर्जदार जिल्हा जाती प्रताणपत्र पडताळणी समिती सांगली येथे कार्यालयीन वेळेत दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर २०२० रोजी अर्ज जमा करु शकतात, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य खुशाल गायकवाड यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- फक्त एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी झाले जमा
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- न्याय, पैसा, हमीभाव आणि सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी,प्रीतम मुंडेंचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

