मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद गेले काही दिवसात प्रचंड टोकाला गेलेला दिसून आला. यानंतर, महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.
आता वीर विनायक सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली आहे. रणजीत सावरकर म्हणतात, ” काँग्रेसने वीर सावरकरांवर घृणास्पद आरोप केले. पण तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत राहिले. कोणतीही कारवाई, गुन्हा दाखल नाही झाला. तेच उद्धव ठाकरे, कंगनाच्या ‘तू’ बोलण्याने दुखावले. कंगनाच कार्यालय उध्वस्त केले. देश हे चित्र बघत आहे, समजत पण आहे.” अशी खोचक टीका केली आहे.
वीर सावरकर को काँग्रेस मुखपत्र ने बलात्कारी कहा गया। लेकीन महाराष्ट्र के मुख्यमंत्री का खून नही खौला। कोही FIR नही हुवा।
वही उद्धव ठाकरे, कंगना के 'तू' बोलने से आहत हुवे है। कंगना का कार्यालय ध्वस्त कर दिया गया। देश यह चित्र देख रहा है। समझ भी रहा है। pic.twitter.com/omKMQAtTKE— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) September 10, 2020
दरम्यान, शिवसेना आणि कंगना रणौत वाद विकोपाला गेला असतानाच भाजप, रिपाइंने मात्र कंगनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या टीकाकरांवर निशाणा साधण्यात आला आहे. कंगनाला दुश्मन म्हणत तिचा जयजयकार करणाऱ्यांना सुनावले आहे. तसेच, बाळासाहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा निखारा अजूनही पेटत असून त्या निखाऱ्यार राख साचली आहे , असे कोणाला वाटत असल्यास एक फुंकर मारून पहावे! असे आव्हान देखील दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- शिवसेनेच्या 70 टक्के शाखा अनधिकृत असतील त्या पण पाडा – निलेश राणे
- सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे – अतुल भातखळकर
- पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन युवक काँग्रेस राज्यात बळकट करणार- अमित झनक


