मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. pic.twitter.com/ANZ4jNjsJq
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
या सर्व प्रकरणाचा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. यावेळी ते म्हणाले कि, “एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.”
पहा काय म्हणाले अतुल भातखळकर :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2997050570569008/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

