Share

शिवसेनेच्या 70 टक्के शाखा अनधिकृत असतील त्या पण पाडा – निलेश राणे

Published On: 

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांची वांद्रेतील कार्यालयाची इमारत म्हाडाने अनाधिकृत असल्याचे सांगत त्यांना यासंबंधीत नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भाजपाकडून त्याच्यावर वारंवार टिका केली जात आहे, मात्र याविषयी बोलताना अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘म्हाडाने दिलेली नोटीस चुकीची आहे, मी त्या जागेचा मालक नाही, नोटीस मालकाला पाठवायची असते, म्हाडाने मला का पाठवली आहे कळलं नाही’ अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मात्र यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘बळजबरीने जागा बळकावल्यानंतर अनिल स्पॉट नाना परब म्हणतो की मला नोटीस आली नाही. नोटीस जागा मालकाला येते हडपणाऱ्याला नाही. व्यवस्थित माहिती काढली तर कळेल 70 टक्के शिवसेना शाखा अनधिकृत असतील… त्या पण पाडा”. अस ट्विट करत निलेश राणे यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, वळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपाने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचं काम सुरु केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!