अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण युवक काँग्रेस संघटना राज्यात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आ.अमित सुभाषराव झनक यांनी केले. पुण्याहून यवतमाळकडे जाताना आ.झनक यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी आ.झनक यांचे स्वागत केले.
यावेळी आ.झनक म्हणाले, माझे वडिल स्व.सुभाषराव झनक व विनायक देशमुख यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर देशमुख यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी पक्ष संघटनेत सातत्याने काम करु शकत आहे. देशमुख यांच्या सारख्या ज्येष्ठांनी राज्यातील युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे यावे, असे आ.झनक म्हणाले.
आ.अमित झनक यांची नम्रपणे काम करण्याची पद्धत पाहता आगामी काळात त्यांना अधिक मोठी संधी मिळणार आहे. राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे आशिर्वाद सदैव त्यांच्या पाठिशी आहेत, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी विशाल रोहोकले, ज्ञानेश्वर आव्हाड, प्रदीप बरबडे, नितेश वराडे, महेश चव्हाण, सुजित चव्हाण, ओंकार ठुबे, मुकुल देशमुख, सागर जाधव यांच्यासह आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी खुर्ची उबवायला मिळाली पाहिजे ; सामनातून रामदास आठवलेंवर घणाघात
- मुंबईचे वस्त्रहरण! सामना अग्रलेखातून टिकाकारांवर झळफळाट
- घाबरून न जाता सावधानता बाळगत कोरोनाला हरवूया ; राज्यपालांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

