Share

अरुण राठोड संदर्भात प्रश्न करताच संजय राठोडांनी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशीकडे केलं बोट !

Published On: 

पोहरादेवी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.

हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.

पूजा चव्हाण हिच्याशी संबंधित अरुण राठोड याच्या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न करताच संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या चौकशीकडे बोट दाखवत अधिक बोलणे टाळले. ‘मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशीच्या तपासामध्ये सर्व बाहेर येईल. मला बाकी काही माहित नाही,’ असं भाष्य संजय राठोड यांनी केलं आहे.

संजय राठोड यांनी आरोप फेटाळले !

‘पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समाजाला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असं देखील संजय राठोड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!