यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल झाले होते. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवरत घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहे. समर्थकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केलं गेलं आहे.
यावेळी पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समजला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे.
तर, सोशल मीडियावर फोटो आपण सर्वजण पाहता. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली 30वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे. एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका, असं संजय राठोड म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- खबरदार! विनामास्क ‘एसटी’त चढाल तर
- शिर्डीला जात असाल तर ही बातमी वाचाच, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घेतला मोठा निर्णय
- डॉक्टर असूनही औषधाचा प्रचार कसा करता ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ‘आयएमए’ने फटकारले
- साहेब पिक वाया गेले, आतातरी अनुदान वाटप करा!
- गेल्या काही दिवसांमध्ये घाणेरडं राजकारण सुरु आहे – संजय राठोड


