Share

डॉक्टर असूनही औषधाचा प्रचार कसा करता ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ‘आयएमए’ने फटकारले

Published On: 

नवी दिल्ली: कोरोना काळात पतंजली या देशातील आयुर्वेदिक औषध निर्मिती कंपनीने रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी औषध निर्मिती केल्याचा दावा केला होता. त्यानंतर या औषधावर आक्षेप देखील घेण्यात आला होता. कोरोनिल टॅब्लेटला जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने मंजुरी दिल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. परंतु डब्लूएचओने एका अधिकृत ट्विटमध्ये तो दावा फेटाळला आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या ‘कोरोनिल’ औषधाची जाहिरात केल्याबद्दल केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्षेप नोंदवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हे स्वतः एक डॉक्टर असतानाही औषधाचा प्रचार कसे करतात? असा सवाल आयएमएने केला आहे. डॉक्टरने तसे करणे मेडिकलच्या नियमाविरुध्द आहे असे आयएमएचे म्हणणे आहे.

पतंजलीने ‘कोरोनिल टॅब्लेट’ नावाने आयुर्वेदिक औषध बाजारात आणले आहे. 19 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी ते औषध लॉन्च केले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्री चुकीच्या पध्दतीने आणि कोणत्याही शास्त्रीय आधाराविना बनवण्यात आलेल्या औषधाला प्रोत्साहन देऊ शकत नाही असे आयएमएने म्हटले आहे. कोरोनिल औषध हे कोरोनावर प्रभावी आहे तर सरकार लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपये का खर्च करत आहे, असाही आयएमएचा सवाल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!