Share

गेल्या काही दिवसांमध्ये घाणेरडं राजकारण सुरु आहे – संजय राठोड

Published On: 

पोहरादेवी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातआरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. समर्थकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केलं गेलं आहे.

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समाजाला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर, मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी नेमली आहे. गेल्या काही दिवसांपासून जी बदनामी सुरु आहे ते थांबवावं. मी १४ दिवस नाही तर फक्त दहा दिवस लांब होतो. माझ्या वृद्ध आईवडील, पत्नी व मुलांसमवेतच मी होतो, असं भाष्य संजय राठोड यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!