Share

वडिलांचे कार्यक्रम काहीही असोत, पण मुलगा चांगला आहे; मुंबईच्या महापौरांचा सोमय्यांना टोला

Published On: 

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी काल नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांना टोले लगावले. “किरीट सोमय्या नेहमी इतरांवर आरोप करत असतात, वडिलांचे कार्यक्रम काहीही असोत पण मुलगा चांगला आहे, अर्थात खाई त्याला खवखवे म्हणायला हवं. बाकी उलट आरोप करणाऱ्यांना कावीळ झाली की त्यांना संपूर्ण जग पिवळं दिसतं, असा चिमटाही त्यांनी काढला. नील सोमय्या प्रकरणात पोलीस तपासातूनच सर्व काही स्पष्ट होईल.” अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई महापालिका दिवाळखोरीत असल्याचं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्याचाही महापौरांनी समाचार घेतला.”कोरोनामुळे भलेभले दिवाळखोरीत निघालेत. मुंबई महापालिकेलाही आर्थिक अडचणी आहेत. नाही असं नाही. पण महापालिका दिवाळखोरीत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. आरोप करणाऱ्यांना करू द्या. आम्ही मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!