पुणे : कालचा संपूर्ण दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस ठरला आहे. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षाकाळ अचानक पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे संतापाचा बांध फुटल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी काल दिवसभर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते.
ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर थोड्याच वेळात याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडण्यास सुरुवात झाली होती होती. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राम सातपुते यांना पोलिसांनी अटक केलेली होती.
‘सरकार पोलिसांचा वापर करून राज्यात दडपशाही करत आहे, महाराष्ट्रातील लोकांचा विश्वासघात करत आहे. माझ्यासह ९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, २५ लोकांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती केली कि जे काही गुन्हे तुम्हाला दाखल करायचे आहेत ते आमच्यावर करा. परंतु विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नका त्यांच्या भविष्याचा विचार करा.’ अशी विनवणी पोलिसांना केली असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
तसेच १४ तारखेला परीक्षा होणार म्हणून, सात दिवसापासून जे विद्यार्थी या सेंटर वर येउन थांबली आहेत, जे गरजू मुलं आहेत त्या मुलांना प्रत्येकी २० हजार रूपये भत्ता दया अशी विंनती मी करतो. तसेच कोरोना काळात तुम्ही परीक्षा वाढवलेल्या आहेत त्याच्यासाठी २ वर्ष वयोमर्यादा वाढवून दया अस ते या वेळी म्हणाले आहेत. दरम्यान आता एमपीएससीची परीक्षा २१ मार्च रोजी होणार असे जाहीर करण्यात आलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गुगल पे’ अॅप सेटिंगमध्ये बदल ग्राहकांना मिळणार ‘हा’ पर्याय
- #MPSC : ‘तुमच्या विभागाने तुम्हालाच न विचारता निर्णय घेऊन तुम्ही किती ‘लायक’ आहात हे दाखवून दिले’
- पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

