Share

पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याच जाहीर करण्यात आली होते. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बऱ्याच गोंधळानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली. यामुळं आज एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा कुठल्याही क्षणी होणर असल्याची शक्यता वर्तवली गेली होती तर आता हि परीक्षा २१ मार्चला होणार असल्याच एमपीएससी कडून जाहीर करण्यात आल आहे.

याआधी एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठी घोषणा केली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

‘स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री श्री. अजितदादांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे.’ अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!