Share

‘गुगल पे’ अॅप सेटिंगमध्ये बदल ग्राहकांना मिळणार ‘हा’ पर्याय

Published On: 

नवी दिल्ली: डीजीटल पेमेंटच्या काळात पैशांची देवाणघेवाण करणे अगदी सोपे झाले मात्र याच डीजीटल पेमेंट करताना अनेक प्रकारच्या धोक्यांची शक्यता असते. यामध्ये तुमच्या बँक खात्याला धोका पोहचवून आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

यामध्ये आता गुगल पे या डीजीटल पेमेंट अॅपने वापरकर्त्यांचे व्यवहार अधिक सुरक्षित होण्याकरिता कंपनीकडून गुगल पे नवीन बदल करणार आहे. या बदलानुसार वापरकर्त्याला आर्थिक व्यवहाराच्या माहितीचे नियोजन करता येणार आहे.वापरकर्त्यांना ‘गुगल पे’मधील आर्थिक व्यवहाराची आकडेवारी काढून टाकता येणार आहे. तसेच ‘गुगल पे’ मधील माहिती वैयक्तीकरणामधून काढण्याचा पर्यायही देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून ‘गुगल पे’ अॅप सेटिंगमधील बदल करण्याचे पर्याय वापरकर्त्यांना मिळणार असल्याचे गुगल पेच्या उपाध्यक्ष (उत्पादन) अंबरीश केंघे यांनी सांगितले.

‘गुगल पे’मध्ये वैयक्तीकरणातून वापरकर्त्याला चांगला अनुभव मिळणार आहे. उदाहरणार्थ वापरकर्त्याला अधिक ऑफर आणि बक्षीस मिळू शकणार आहेत.हेही वाचा-आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करून १४ वर्षांच्या मुलाला दिले पुनर्जीवनजे वापरकर्ते ‘गुगल पे’ हे अँड्राईड आणि आयओएसवर अपडेट करणार आहेत, त्यांना नवीन फीचरचा लाभ घेता येणार आहे. तुमची वैयक्तिक माहिती कधीही दुसऱ्यांना विकण्यात येत नसल्याचे गुगलने म्हटले आहे. तसेच आर्थिक व्यवहाराची माहितीही गुगलच्या उत्पादनांसाठी आणि जाहिरातीसाठी वापरण्यात येत नसल्याचेही गुगल पेने म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!