🕒 1 min read
मुंबई: पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्धशतक केले आहे. तिचे हे अर्धशतक ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात आले आहे. तिने आलिया रियाझ जिने ५३ धावा केल्या तिच्यासोबत मिळून विक्रमी भागीदारी केली आहे. या दोघीनी मिळून पाकिस्तानसाठी ९९ धावांची भागीदारी केली ज्यात बिस्माहने ७८ धावांची नाबाद खेळी केली.
बिस्माहने मारूफने (bismah maroof) तिच्या खेळीत आठ चौकार मारले. तसेच जून २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७९ धावा करणाऱ्या नाहिदा खाननंतर महिला विश्वचषकात पाकिस्तानच्या फलंदाजाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. बिस्माहने अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे तिच्या आईकडे आणि बेबी फातेमा कडे पाहत अनोख्या अंदाजात सेलिब्रेट केले. असे सेलिब्रेशन ज्याला ‘बेबी कार्डल’ सेलिब्रेशन म्हणतात ते क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदा पुरुष खेळाडूकडून आले आहे. मात्र पहिल्यांदाच एका महिला खेळाडूने असे सेलिब्रेट केले आहे.
https://www.instagram.com/reel/Ca0_aivI7dy/?utm_medium=copy_link
भारत विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात बिस्माह मारुफचे नाव चर्चेत आले होते. जेव्हा भारतीय संघातील खेळाडू तिची मुलगी बेबी फातिमा सोबत मस्ती करत होते. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. स्मृती मंधानानेही (smriti mandhana) बिस्माहसाठी स्पेशल पोस्ट लिहली होती. ज्यात तिने आई झाल्यानंतर ६ महिन्यात मैदानावर परत आल्याबद्दल कौतुक केले होते. बिस्माहचे हे बेबी कार्डल सेलिब्रेशनचे फोटोही व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “कर नाही त्याला डर कशाला?”, ईडीच्या धाडीवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा उद्या ‘विराट मोर्चा’, आशिष शेलारांची माहिती
- आर अश्विनने विक्रम मोडल्यानंतर कपिल देव यांची पहिली प्रतिक्रिया, दिले ‘हे’ मोठे चॅलेंज
- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा खो-खो स्पर्धेत प्रथम!
- लेखक गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेच सडेतोड उत्तर..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
