Share

Shivsena | ‘धनुष्यबाण’ गोठलं! परंतू शिवसेनेकडे अगोदर कोणती चिन्हं होती?, जाणून घ्या त्यामागचा इतिहास

Published On: 

मुंबई :  शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यामुळे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह देण्यात आली आहेत. आता आयोग ठाकरे गटाला कोणतं चिन्ह देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आपल्या सर्वांना शिवसेना पक्षाचा इतिहास माहित असेल, परंतू शिवसेना पक्षाच्या चिन्हाचा इतिहास माहीत आहे का ?. शिवसेनेला चिन्ह कधी मिळालं?, ते मिळायच्या आधी शिवसेनेनी कोणत्या पक्षांवर निवडणूका लढवल्या?. या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

काय आहे शिवसेना पक्षाच्या चिन्हामागचा इतिहास ?

शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली आहे. त्यानंतर 1968 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती. 1980 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ‘रेल्वे इंजिन’ हे चिन्ह मिळाले होते. तर 1985च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, वॅट बॉल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यामुळे 1989 पासून गेली 33 वर्ष लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह होते.

1989 आधी शिवसेना पक्षाची अधिकृत नोंदणी नव्हती. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची नोंद ही अपक्ष म्हणूनच होत होती. परंतू नंतर 1989 मध्ये निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची नोंद झाली अन् शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. तसेच, 1985 मध्ये ‘छगन भुजबळ’ निवडून आले होते, पण त्यांची गणना अपक्ष म्हणूनच करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!