🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटांना (उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट) आज 1 वाजेपर्यंत आयोगासमोर आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर करायची होती. त्यानूसार दोन्ही पक्षांनी तीन-तीन चिन्ह आणि पक्षाचं नाव सादर करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह देणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आयोगाकडून शिंदे गट आणि ठाकरे गटाला ‘ही’ मिळणार चिन्ह
उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे चिन्ह दिले. एकनाथ शिंदे यांच्या गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह दिले आहेत. दोन्ही गटांनी दिलेल्या चिन्हांपैकी त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे दोन चिन्ह समान असल्यामुळे ठाकरे गटाला त्रिशूळ. तर शिंदे गटाला गदा हे चिन्ह मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.
तसेच, दोन्ही गटांच्या चिन्हांबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत असून, निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला नेमकं कोणतं चिन्ह देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून न्यायालयात याचिका दाखल
दरम्यान, निवडणूक आयोगाने अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीमध्ये ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्लीतील उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या याचिकेमध्ये शिवसेनेने निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं म्हटलं असल्याची माहिती समोर येतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | नागपूरचे २४ चड्डी पकडून भाजपने प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेतली – नाना पटोले
- Dhananjay Munde । मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं, धनंजय मुंडेंनी सांगितला राष्ट्रवादीत आल्याचा किस्सा
- Travel Guide | भारतातील ‘हि’ ठिकाणे देतील युरोप ट्रिपचा अनुभव
- Devendra Fadnavis | निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- Nana Patole । “अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये आमचा हात निश्चितच त्यांच्यासोबत राहील”; नाना पटोलेंचा ठाकरेंना शब्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
