🕒 1 min read
रायपूर : आपल्या व्हायरल व्हिडीओजवरून नेहमीच चर्चेत असणारे अकोल्याचे कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत.
रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर रविवारी सायंकाळी कालीचरण यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
यह भगवाधारी फ़्रॉड राष्ट्रपिता महात्मा गाँधी को सरेआम गालियाँ दे रहा है, इसे तत्काल अंदर करना चाहिए।
गाँधी जी से किसी को वैचारिक मतभेद हो सकता है,पर उनका अपमान करने का हक किसी को नहीं है।
यह अक्षम्य अपराध है।pic.twitter.com/ToQF1ZC8AJ— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 26, 2021
दरम्यान, कालीचरण महाराजांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व स्तराहून संताप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केवळ काँग्रेससह अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
