Share

ऐसी भी क्या नाराजगी? मुंडे भगिनींकडून नुतन मंत्र्यांचे साधे अभिनंदनही नाही!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काल बुधवारी विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांचा समावेश आहे.

लोकसभेत दोन वेळा विक्रमी मतांनी विजय, उच्चशिक्षीत आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा होती. पण, ज्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे डॉ. भागवत कराड यांना महापौरपदाची संधी मिळाली त्यांनाच आता मुंडेंऐवजी केंद्रात संधी मिळाली. यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा.प्रितम मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

कारण, या दोन्ही भगिनींनी अद्यापपर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय कराड यांच्यासह नुतन मंत्र्यांचेही अभिनंदन केलेले नाही. एरवी सोशल मीडियाद्वारे नेहमी सक्रिय असणाऱ्या मुंडे भगिनींनी मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही पोस्ट केली नाही. काल बुधवारी फक्त पंकजा मुंडे यांनी आपण मुंबईतच असल्याची माहिती देणारे ट्विट शेअर केले. तेच ट्विट प्रीतम मुंडे यांनी रिट्विट केले. त्यानंतर दिवसभर घडलेल्या घडामोडींवर मुंडे भगिनींनी काहीही भाष्य केले नाही. शिवाय माध्यमांनाही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्या दोघीही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

तीन वेळेस मंत्रिपदातून डावलले
पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी खासदार डॉ. मुंडे यांचे नाव मागील ८ दिवसांपासून आघाडीवर होते. परंतु, या मंत्रिमंडळात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे समर्थक व सध्याचे राज्यसभा खासदार भागवत कराड याची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या प्रीतम यांना केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लावून गोपीनाथ मुंडेंचे विकासाचे स्वप्न पूर्ण करतील, अशी आशा होती. परंतु पदरी निराशाच पडली. २०१९ लाही मंत्रिपदातून प्रीतम यांना डावलण्यात आले. तर दुसरीकडे त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून मुंडेंचा पराभव झाला. पंकजांना पराभूत करण्यासाठी राज्यातील भाजपच्याच काही नेत्यांनी परळीत रसद पुरवल्याचा आरोप आजही केला जातो.

पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांचे खच्चीकरण
मास लिडर असल्याने पंकजा यांचे भाजप पुनर्वसन करेल अशी आशा जिल्ह्याला होती. परंतु, पंकजांना सुरुवातीला विधान परिषद, त्यानंतर राज्यसभेवरही डावलले. अचानकपणे औरंगाबादच्या भागवत कराडांना भाजपने खासदारकी बहाल केली. तसेच विधानसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंना भाजपने राष्ट्रीय सचिवपदाची दिली. गेल्या ७ वर्षांच्या काळात भाजपमधील काही नेत्यांतून पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोपही आता समर्थकांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!