🕒 1 min read
श्रीलंका : भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका सुरू होण्यास अजून एक आठवडा शिल्लक आहे. परंतु त्याआधीच श्रीलंका टीममध्ये बरेच वाद चालू आहेत. ही मालिका सुरू होण्याआधीच श्रीलंका संघातील बड्या खेळाडूंनी माघार घेतली. यातच श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजनेअँजे “पुढील सूचना मिळे पर्यंत” सर्वसाधारणपणे “राष्ट्रीय कर्तव्यातून” माघार घेतली आहे, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) बुधवारी दिली.
श्रीलंका क्रिकेटने मालिकेसाठी निवडलेल्या 30 पैकी 29 खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली होती. श्रीलंका बोर्डाबरोबर त्यांच्या खेळाडूंच्या कराराबाबत वाद झाला होता. नवीन कराराला खेळाडूंचा विरोध होता.
34 वर्षीय अँजेलो मॅथ्यूज हा नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघाचा भाग नव्हता. तो अखेर एप्रिलमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान श्रीलंकेकडून खेळला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेत तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी -20 सामने खेळले जाणार आहेत. याची सुरुवात 13 जुलै रोजी होईल.
Sri Lanka Cricket wishes to announce that 29 players, out of the 30 members nominated by the Cricket Selectors to be considered for the White-Ball Series against India, have signed the Tour Contract. https://t.co/ZYpq69rVo4
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 7, 2021
Angelo Mathews, who was included in the respective 30-member squad, requested Sri Lanka Cricket to relieve him from National Duties, owing to personal reasons, until further notice. https://t.co/ZYpq69rVo4 #SLC #LKA
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 7, 2021
श्रीलंका क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात मॅथ्यूजबद्दल असे म्हटले होते की, ‘श्रीलंका क्रिकेट माहिती देते की भारतविरुद्ध मालिकेसाठी निवड समितीने निवडलेल्या 30 सदस्यांपैकी 29 खेळाडूंनी करार केले आहेत. श्रीलंका क्रिकेटला वैयक्तिक कारणास्तव स्वत: ला राष्ट्रीय कर्तव्यापासून मुक्त करण्याची विनंती करणाऱ्या 30 सदस्यांपैकी अँजेलो मॅथ्यूज देखील होते. त्याने परत येण्यासाठी कोणतीही तारीख दिलेली नाही. त्याचबरोबर सूत्रांनी पीटीआयला सांगितले की अँजेलो मॅथ्यूज आणि कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांना सध्याच्या कराराच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. हे कंत्राट 7 जुलै रोजी खेळाडूंना देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावयाच्या अटकेनंतर ईडीने बोलावणं धाडलं !
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
