Share

…अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !

Published On: 

मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विस्तारित टीममध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भरती पवार, भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास टाकत केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे .

२०१४ साली कपिल पाटील हे जिल्हा बॅंकेचे चेअरमन असताना एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा ) यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात कपिल पाटील हे महत्वाची भूमिका बजावतील असे भाकित केले होते. कपिल पाटील यांनी आज केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आबांच्या या भाकिताचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!