🕒 1 min read
मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खिरी येथे घडलेल्या शेतकरी दुर्घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. तर याभागाच्या सीमा योगी सरकारने सील केल्या. अनेक राजकीय नेत्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून योगी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. त्यांच्यापर्यंत विरोधकांना, शेतकरी नेत्यांना पोहोचू दिले जात नाही. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
प्रियंका गांधी शेतकऱ्यांचे हत्याकांड झाले तेथे जाण्यासाठी निघाल्या, त्यांना योगी सरकारने अटक केली. अटक करताना असभ्य वर्तन केले. खासदार हुड्डा यांना धक्काबुक्की केली. हे काय चालले आहे? अखिलेश यादव यांनाही कोंडून ठेवले आहे. इतका कडेकोट बंदोबस्त करण्यापेक्षा सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य का करीत नाही? त्यांचे म्हणणे का ऐकत नाही? शेतकरी ठार मेला तरी चालेल, पण सरकार एक इंचही मागे हटणार नाही, हा ताठा व बाणा स्वकियांविरुद्ध जितका आहे, तितका परकीय आक्रमकांविरुद्ध दिसत नाही! लखीमपूर खेरीच्या सीमा ज्या पद्धतीने सीलबंद केल्या तेवढा ताठा चीन सीमेवर दाखवला असता तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती. असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शेतकऱ्यांच्या रक्तापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर.. ‘
- ‘तुम्ही कितीही एकत्र आलात, तरी देखील आम्ही देगलूरची जागा जिंकणारच’ चंद्रकांत पाटलांचा दावा
- ‘लखीमपूरच्या सीमा ज्या पद्धतीने सीलबंद केल्या तेवढा ताठा चीन सीमेवर दाखवला असता तर..’
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यमंत्री सत्तार
- सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
