🕒 1 min read
नांदेड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाना साधला आहे. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. तर यावेळी त्यांनी म्हटले आहे की, आम्ही पंढरपूर जिंकले. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या.साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात २१ पैकी २१ जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आलात तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
देगलूर बिलोली पोटनिवडणूक आम्हीच जिंकू. कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपा, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती, जनसुराज्य ही आमची युती विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीला पुरून उरेल. येथील विजयाने राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 4, 2021
विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिलं. महाविकास आघाडीला निवडलं नाही. युती केली नसती तर भाजपाचे 144 आमदार निवडून आले असते, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
